कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५-२०२६

भारतीय जनता पार्टी

“आपली निशाणी: कमळ – प्रभाग क्र. २५”
डोंबिवली पश्चिमचा विश्वास, विकास आणि विचारधारेचा आवाज

🙏 आमचा परिचय 🙏

श्री. नंदू शांताराम म्हात्रे

गेली ३५ वर्षे डोंबिवली पश्चिमेतील गरीबवर्ग आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. विभागातील नागरिकांच्या जगण्यात सुलभता यावी, हाच ध्यास घेऊन नागरिक आणि प्रशासनाला दुवा होत रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे विषय मार्गी लावले. कोविडसारख्या संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकसेवेसाठी हजर राहिलो. परिवहन समितीचा सदस्य असताना मिनी बस सेवा सुरू करून प्रवाशांचा प्रवास सुखकर केला. २००५ ते २०२० या काळात नगरसेवक म्हणून काम करताना प्रभाग ५७ आणि ५८ च्या कायापालट करणारी विकासकामे केली. अरुणोदय सोसायटी सदस्य, गावदेवी मंदिर ट्रस्टचा विश्वस्त आणि खजिनदार, संवाद कन्व्हेअर प्रबोधिनीचा कोषाध्यक्ष आणि प्रगती कॉलेजचा संचालक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. काळ धरणारे पाणी मिळवून देऊन शहराचा पाणिप्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हे माझे आताचे मुख्य ध्येय आहे. हा अनुभव आणि निश्चयाच्या बळावर विकासाची गती कायम राखण्यासाठी मी आपल्या प्रभाग क्र. २५ (अ) मधून निवडणूक लढवत आहे.

सौ. मुग्धा उमेश नाख्ये

संघ परिवाराचे बालकडू मिळाल्यामुळे आपण समाजाचं देणं लागतो, ही भावना मनात रुजली आहे. ती जोपासत मी आजवर काम केले आहे. शस्त्रक्रिया सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरेची मूल्ये रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शहरासाठी आणि संघटनेसाठी लोकहिताची व्यक्ती घडवणे, ही जाणिव ठेवूनच आजवरची प्रत्येक जबाबदारी पार पाडली. एक सशक्त, समृद्ध आणि तितकंच सुसंस्कृत शहर घडवण्यावर माझा भर राहिला आहे. याच सुसंस्कृत विचारांची जोड देत महानगरपालिकेत आपल्या प्रभागाचं प्रभावी प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आपल्या प्रभाग क्र. २५ (ब) मधून निवडणूक लढवत आहे.

श्री. समीर रमेश चिटणीस (BE Mech)

भारतीयत्व हेच राष्ट्रत्व या विचारधारेचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता. याच तत्वांना अनुसरून आपल्या विभागात गेल्या वीस वर्षांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मंडळाचा उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या गेली नऊ वर्षे समर्थपणे आणि तितक्याच समर्पित भावनेने सांभाळल्या आहेत. म्हणून तर नागरी समस्या आणि लोक वर्गाशी श्रद्धापूर्वक मी विधायक काम करू शकलो आहे. प्रभागातील वीज-पाणी पुरवठ्याचे प्रश्न असोत, पोलिस ठाण्याशी संबंधित वा रेशनिंग विषयक काम असोत, रुग्णालयीन उपचार अथवा शाळा-महाविद्यालयीन प्रवेशसंबंधीची काम असोत — प्रत्येक कामासाठी मी नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहिलो आहे. याच भावनेतून कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठ्यासह वैद्यकीय मदतही पुरवली, तसेच जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल यासाठीही पुढाकार घेतला. निवृत्तिवेतनधारकांना सुलभपणे ऑनलाईन पद्धतीने त्यांची तक्रार नोंदवता यावी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले. आपल्या कार्यक्षम नेतृत्वावर आणि प्रामाणिक कार्यपद्धतीवर खंबीर साथ आणि दृढ जनविश्वास कायमच माझ्यासोबत होता. म्हणूनच हे सगळे ध्येय शक्य झाले. भविष्यात प्रभागाचा विकास अधिक नियोजनबद्ध असेल आणि त्याला आधुनिकतेची जोड असेल हेच माझे लक्ष्य असणार आहे. त्यासाठी मी आपल्या प्रभाग क्र. २५ (क) मधून निवडणूक लढवत आहे.

🙏 आवाहन 🙏

प्रिय मतदार बांधवांनो,

डोंबिवली पश्चिम परिसराशी जन्मापासून नाळ जोडलेला, गेली दोन दशके सामाजिक, राजकीय आणि नागरी क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेला एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेत वाढलेला आणि जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहणारा प्रतिनिधी म्हणून मी कार्यरत आहे.

भारतीय जनसंघापासून आजच्या भारतीय जनता पक्षापर्यंतचा प्रवास हा राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारित आहे.
भारत माता हेच आराध्य दैवत मानून राष्ट्रसेवा, सांस्कृतिक जागृती आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे, हाच आमचा संकल्प आहे.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात भारताने विश्वासार्ह राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प आता वास्तवात उतरतो आहे.

आपला विश्वास व प्रेम कायम राहो, हीच नम्र अपेक्षा.

आपलाच,
श्री. समीर रमेश चिटणीस
महायुती अधिकृत उमेदवार – प्रभाग क्र. २५ 
(भाजपा – शिवसेना – रिपाई)

राष्ट्र प्रथम

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्वाखाली गेल्या दशकात भारताने विश्वासाच्या अभावातून बाहेर पडत जागतिक स्तरावर विश्वासार्ह राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
२०४७ पर्यंत विकसित भारत उभारण्याची संकल्पना केवळ ध्येय न राहता, ती प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.

संघटन द्वितीय

भारतीय जनसंघापासून सुरू झालेला आणि आज भारतीय जनता पक्ष म्हणून विस्तारलेला हा प्रवास भारत मातेला सर्वोच्च मानून राष्ट्रसेवेचा व्रत म्हणून पुढे नेला जात आहे.
राष्ट्रहित, सांस्कृतिक चेतना आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष सदैव कार्यरत आहे.

व्यक्ति अंतिम

गेल्या पाव शतकापासून राष्ट्रहित, जनकल्याण आणि सांस्कृतिक मूल्ये या मूलभूत तत्वांवर आधारित मार्गावर चालताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष परिवारातील मार्गदर्शकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची निष्ठावंत साथ आणि जनतेचा विश्वास हाच आमचा खरा आधार ठरला आहे.
याच भक्कम पायावर पुढील वाटचाल आत्मविश्वासाने सुरू आहे.

कार्य व उपक्रम

  • सरकारी योजनांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन

  • लाडकी बहीण योजना, आधारकार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्न दाखला व सुविधा

  • कोविड काळात १०,०००+ नागरिकांचे मोफत लसीकरण

  • Vaccination

  • वृद्धांसाठी अन्न योजना

  • वस्तीतील वयोवृद्ध नागरिकांना हेल्प डेस्क
    (विशेष सेवा)

  • समग्र आरोग्य योजना राबविणे

  • गृहनिर्माण योजनेची नोंदणी (Registration)

  • पाणी पुरवठा प्रश्न

  • पाणी गळतीची समस्या

  • कचरा विल्हेवाट
    लोकांची पोलिस स्टेशन – KDMC
    Ration office संदर्भातील समस्या

  • स्वच्छ पाणी पुरवठ्याची समस्या

  • School & College Adm संदर्भातील मदत

  • Senior नागरिकांना हेल्प डेस्क

  • महिलांसाठी स्वावलंबन मदत

  • आपत्ती काळात अन्नधान्य व मदत वितरण

  • जलकपात व आरोग्य सेवा समस्यांवर तत्काळ पाठपुरावा

  • केडीएमसी संदर्भित नागरी तक्रारी

  • शाळा–महाविद्यालय प्रवेश मार्गदर्शन

  • नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन

  • तरुणांसाठी नेटवर्किंग व सहाय्य

  • २४x७ उपलब्ध कार्यकर्ता यंत्रणा


आपली निशाणी – (कमळ)


आपली निशाणी – (कमळ)

आमचे ध्येय

डोंबिवली पश्चिमसाठी दृष्टीकोन

  • मूलभूत सुविधांचा दर्जात्मक विकास

  • स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते सुधारणा

  • महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांसाठी विशेष योजना

  • सुरक्षित, सुव्यवस्थित व आधुनिक डोंबिवली

  • पारदर्शक प्रशासन व लोकसहभाग

  • अंडरग्राऊंड Electricity लाईन पावसाळ्यातील अडचण दूर करणे
  • पाणी गळतीची समस्या योग्य पाणी पुरवठ्याचे नियोजन KDMC कडून योग्य काम करून घेणे
  • झोपडपट्टी भागात पाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन
  • प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी IT Training / Computer ट्रैनिंग सुविधा उपलब्ध करून घेणे
  • Cyber Crime जागृती & Digital Awareness


आपली निशाणी – (कमळ)


आपली निशाणी – (कमळ)

मान्यवरांचे अभिप्राय

मतदारांना आवाहन

केंद्रात नरेंद्र मोदीजींचे सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखालील सरकार असताना,
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आवश्यक आहे.

प्रभाग क्रमांक २५ मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन —

कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून
महायुतीच्या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा.

🗳️ मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०


आपली निशाणी – (कमळ)


आपली निशाणी – (कमळ)

भाजपा कार्यालय – डोंबिवली पश्चिम
जनतेसाठी सदैव खुले

Top Rated Book Collection

Book Your Appointment

M

Close

Latest Article
Mauris hendreritonly tincidunt nisifdf id iaculis erat malesuada et Pellentesque consecteasdtur nisl eu lobortis laoreet ligula nunc tristique lorem vitae faucibus mihendreritonly.
Other Links
General Links
&

Homepage

&

About me

&

My books

&

contact me

Design by Divi Pixel Copyright © 2024. All Rights Reserved.